ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

शालेय फीच्या तपासणीसाठी टास्कफोर्स नेमा: ‘आप’ची उपसंचालकांकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

मागील आठवड्यापासून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने तास घेतले जात आहेत. परंतु मागील वर्षाची फी भरली नसल्याने ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना लिंक न पाठवून त्यांना वर्गात बसू न देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. शालेय फी चा तगादा लावून पालकांना वेठीस धरले जात आहे. वीजबिल, देखभाल यासारखे शाळेचे इतर खर्च कमी झाले असून देखील फी कमी केली जात नसल्याचे समोर आले आहे. शाळेच्या फी मध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कडे करण्यात आली होती. परंतु यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ‘आप’च्या वतीने शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन यासंदर्भात टास्कफोर्स नेमण्याची मागणी करण्यात आली.

या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या फी चे ऑडिट करून त्यांनी आकारलेली फी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करते का याची तपासणी करून आपल्या कार्यालयाकडे अहवाल सादर करावा. या टास्कफोर्समध्ये आपले गटशिक्षणाधिकरी, लेखापरीक्षक व 2 पालक प्रतिनिधी असावेत. ज्या शाळा या ऑडिटमध्ये सदोष आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी.

सर्व शाळांनी आपल्या मागील वर्षीच्या खर्चाचे ऑडिट करून अतिरिक्त जमा रकमेचा परतावा पालकांना करावा असे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत, शालेय वर्षाचा कार्यकाळ व अभ्यासक्रम ठरल्यानंतरच पालक शिक्षक कार्यकारी समिती तयार करून त्यांची मान्यता घेतल्यावरच नवीन शालेय वर्षाची फी आकारावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

फी तपासणीसाठी सोमवार पर्यंत टास्कफोर्स नेमण्यात येईल असं शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी शिष्टमंडळास सांगितले. सोमवार पर्यंत टास्कफोर्स न केल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.

यावेळी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाईंसह युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर युवाध्यक्ष मोईन मोकाशी, राज कोरगावकर, पालक प्रतिनिधी दिलीप पाटील, विजय हेगडे, विजय भोसले, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks