ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळमार्फत थेट कर्ज योजना, 20 टक्के बिजभांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. ऑफलाईन योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी संबधितांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. ऑनलाईन योजनेअंतर्गत www.msobcfdc.org या संकेतस्थळावर व्याज परतावा योजना हा पर्याय निवडून अर्ज, संबधित कागदपत्रे पोर्टलवरुन सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.

2021-22 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाचे राहील. 20 टक्के बीज भांडवल योजनेत 75 टक्के कर्ज बँकेचे, 20 टक्के कर्ज महामंडळाचे व 5 टक्के लाभार्थी सहभाग राहील. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील. लाभार्थीने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्क्यापर्यंत व्याज महामंडळ लाभार्थीच्या बैंक खात्यावर जमा करेल. थेट कर्ज योजना आणि 20 टक्के बिजभांडवल योजना ऑफलाईन असून व्याज परतावा योजना ऑनलाइन स्वरुपाची आहे.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब अंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर फोन क्र. 0231-2653512 येथे संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks