अपराजिता पुरस्काराने नवदुर्गांचा सन्मान! ‘आप’च्या वतीने शक्तीपर्व – 2021 चे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
केवळ राजकारणापुरतेच नाही तर समाजातील होतकरु, कर्तुववान व्यक्तीमत्वांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृतीशील असणार्या आम आदमी पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने शक्तीपर्व 2021 या कार्यक्रमाचे आयोजन उद्यमनगर येथील इंजिनिअरींग असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या नवदुर्गांना उद्योजिका आशा जैन आणि सातारा जिल्हा उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या हस्ते अपराजिता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई आणि जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
आप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर अध्यक्ष संदीप दसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरिता सुतार, अश्विनी शेलार, प्रीती क्षीरसागर आदी उपस्थित होत्या.
या शक्तीपर्वामध्ये शुभदा कामत, डॉ. विद्यालक्ष्मी राजहंस, अश्विनी ढेंगे, सारिका पाटील, मंघा मंडलिक, योगी डांगे, आरती पाटील, प्रिया पाटील, अमृता कारंडे आदी नवदुर्गांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानाच्या कार्यक्रमानंतर वैष्णवी पाटील आणि आशा जैन यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास मनोगतातून मांडला.
कार्यक्रमाच्या शेवटी आप महिला आघाडीच्या संघटनमंत्री पल्लवी पाटील यांनी आभार मानले. तर जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.