सोनगेत खंडेनवमी निमित्त पुरातन कालीन शस्त्र व नाणी संग्रह सोहळाचे आयोजन तर 500 हून अधिक शस्त्रांचे पूजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनगे ( ता.कागल) येथे पुरातन कालीन शस्त्र व नाणी संग्रह श्री. अमरसिंह मारुती पाटील यांनी खंडे नवमी च्या निमित्ताने शस्त्रपूजन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे उद्घाटन युवा नेते मा.सत्यजित पाटील (आबा) यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनील घोरपडे होते.
इसवी सन पूर्व ते मुघल साम्राज्य, शिवाजी महाराज ते अलीकडील ब्रिटिशांच्या साम्राज्यच्या काळापर्यंत 180 प्रकारच्या 500 हून अधिक शस्त्रांचे पूजन करनेत आले.प्रतेक शस्त्राचे नाव आणि त्याच्या खालील त्याच काळ आणि उपयोग याची सविस्तर माहिती सहित वेगवेगळ्या स्वरुपात मांडणी केली होती.
यावेळी बोलताना सत्यजित पाटील म्हणाले की ही शस्त्रे म्हणजे इतिहासाचे अबोल साक्षीदार असुन यांचे जतन करणे हेच आपल्या आपल्या शुरविरांना खरी श्रद्धांजली आहे ही शस्त्रे बोलत नसली तरी त इतिहास जतन ठेवण्याचा ते काम करतात मधुकर भोसले यानी अमर पाटील पाटील यांचे कौतूक केले
,सर्व मान्यवरांचा 1 झाड ,शाल ,श्रीफळ देवून सत्कार करनेत आला सोनगे येथील जागृत देवस्थान असणाऱ्या चौंडेश्वरी ला जाणाऱ्या भक्तांनाही शस्त्रे व नानी पाहायला मिळावी या उद्देशाने श्री अमरसिंह पाटील यांनी हा सोहळा आयोजित केला होता यावेळी श्री पत्रकार मधुकर भोसले श्री शेखर सावंत यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी श्री.दत्तात्रय पाटील म्हाकवे, श्री.जयवंत पाटील कुरुकली श्री.चंद्रसेन घोरपडे सरकार ,श्री. जयसिंग पाटील उपसरपंच पांडुरंग कुंभार श्री धनाजी पाटील,प्रल्हाद देवडकर,संजय कळंत्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक रमेश पाटील तर आभार भरत कांबळे यांनी मानले.