…आणि श्री दौलतराव निकम विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे अपघातग्रस्त प्रवाशांनी मानले आभार.

वेळ पहाटेची….मुंबई ते बेंगलोर प्रवासी गाडीचा कागल तालुक्यातील व्हन्नूर गावाजवळ अपघात…चालकही घाबरून पळून गेलेला… गाडीतील प्रवाशी दूरचे गुजरात, राजस्थान, मुंबई येथील…रस्त्यावरुन येणारे-जाणारे केवळ बघ्याची भूमिका घेत जात होते… अशावेळी येथील श्री दौलतराव निकम विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस तर केलीच याशिवाय सर्वांना पाणी, चहा, बिस्किटे घेऊन एक माणुसकीचा ओलावा दाखविला.
कागल मुरगूड रोडवरील व्हन्नूर येथील आवटे मळ्यानजीक असणाऱ्या ओढ्याजवळ मुंबई-बेंगलोर प्रवाशी गाडीचा पहाटे अपघात झाला होता. प्रवाशांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. त्यात मराठी भाषा न बोलणाऱ्यांची संख्या जास्त होती. अपघातानंतर चालक घाबरून पळून गेला होता. पोलीसांनासुद्धा उशिरा माहिती मिळाली. त्यामुळे प्रवाशी प्रचंड तणावाखाली व घाबरलेल्या स्थितीत होते. अशावेळी श्री दौलतराव निकम विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार, एस.बी.पाटील, शानाजी माने, बाळासो गुरव, एकनाथ कांबळे यांनी पाणी, चहा, बिस्कीटे देवून धीर दिला. त्यामुळे सर्व प्रवाशी तणावमुक्त झाले. प्रवाशांबरोबरच पोलिसांनीही प्रशालेचे कौतुक केले.