अनंतशांतीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा समावेश

कुडूत्री प्रतिनिधी :
अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातून पाच शिक्षकांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्य आदर्श शिक्षक पुरस्काराने (२०२१) गौरविण्यात आले असल्याचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव यांनी सांगितले.
अनंतशांती संस्था प्रत्येक विशेष दिनाचे महत्व साधत त्या दिवसाच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करत असते.गेले तेरा वर्षे संस्थेने वेगवेगळे पुरस्कार देऊन समाजप्राप्ती योगदान देणाऱ्या व्यक्तींचा नेहमी गौरव केलेला आहे.
शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देऊन पुढील भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक आपले सर्वस्व देत असतात,वेगवेगळे उपक्रम,शिष्यवृत्ती,स्नेहसंमेलन, कला,क्रीडा,सांस्कृतिक,सामाजिक, वेगवेगळ्या उपक्रमातून भरीव योगदान देतात.अशा अष्टपैलू शिक्षकांच्या गुणांची दखल घेत हे पुरस्कार देण्यात आले आहेत.पुरस्कारासाठी शाल, फेटा,सन्मानपत्र,ट्रॉफी,असे स्वरूप असणार आहे.
जिल्ह्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडप्राप्त शिक्षकांची नावे अशी (१) मोहन राजाराम सुतार,विद्या मंदिर ऐनी – धाऊरवाडा (ता.राधानगरी) (२) संदीप ईश्वरा वाली,विद्या मंदिर घुडेवाडी (ता.राधानगरी),(३)गोरख शिवा कांबळे, मानव हायस्कुल शेंडूर (ता. कागल),(४) विजय हिंदुराव पाटील,विद्या मंदिर साके (ता.कागल),(५) ईश्वर दत्तात्रय शिंदे,विद्यामंदिर खमलेहट्टी (ता गडहिंग्लज)आदी या आदर्श शिक्षक पुरस्कार निवड कामी संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव,अध्यक्ष डॉ.माधुरी खोत,सचिव अरुणा पाटील,पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सागर लोहार,राधानगरी -भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले,अमर निळपणकर,युवराज खोत,आदींच्या मार्गदर्शनातून ही निवड करण्यात आली.