ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला

कोल्हापूर प्रतिनिधी :
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे कोल्हापुरातून माजी आमदार अमल महाडिक यांनी आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील,आ.प्रकाश आवाडे,प्रा.जयंत पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी ११.०० वाजता हॉटेल पंचशील येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.