धोक्याची घंटा : महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांचा गंभीर इशारा
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये आली होती.

मुंबई :
महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिला आहे.
डिसेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ही लाट हलकी असेल आणि त्याचे कुठलेही गंभीर परिणाम दिसणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात 80 टक्के नागरिकांना कोरोनाची किमान एक लस दिली गेली आहे. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट ही सौम्यच असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे अंदाज?
महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये आली होती.
त्यानंतर दुसरी लाट एप्रिल 2021 मध्ये आली, त्यानुसार तिसरी लाट डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे बहुतांश मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज अगोदरच विकसित झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातीत 80 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असल्यामुळे त्यांना कोरोनाचा अधिक त्रास होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज आहे.

यंत्रणा झाल्या सज्ज
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या लाटेच्या वेळी असणाऱ्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आता दीडपट वाढ करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सध्या 9,678 कोरोना केसेस असून देशातील 2.12 एवढा सर्वाधिक मृत्यूदर आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला 1.77 कोटी कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध असून त्त्यातील 1.13 कोटी कोव्हिशिल्डचे तर 64 लाख कोव्हॅक्सिनचे डोस आहेत. आणखी एका कोरोना व्हायरसचा इशारा! उंदीर आणि माकडांपासून होऊ शकेल संक्रमण- स्टडी अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतही 30 हजार बेड सज्ज ठेवले जातील, अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त नगर आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत 60 लाख जणांना कोरोना होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.