आजरा शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या सोडविणार : स.पो.नि. सुनिल हारुगडे

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा शहरात सातत्याने निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या सर्व लोकप्रतिनिधी,नगरपंचायत,प्रशासन,व नागरिक या सर्वांच्या सहकार्याने सोडविणार असल्याचे मत नूतन स. पो. नि. सुनील हारुगडे यांनी निकाल न्यूजचे आजरा प्रतिनिधी पुंडलिक सुतार यांचेशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना, श्री हारुगडे म्हणाले की सर्वांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडावा. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणीही वर्तन करू नये. आतापर्यंत आजरा तालुका शांततेत नांदतो आहे. इथूनपुढेही अशीच आपल्याला अपेक्षा आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रतिनिधी पुंडलिक सुतार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांची आतापर्यंत 11 वर्ष इतकी पोलीस दलात सेवा झाली असून त्यांचे मुळ गाव शाहूवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी हे आहे. भिलवडी पोलीस ठाणेकडे असताना बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपींना पकडून एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत आरोपीवर तडीपारीची कारवाई केली तसेच सांगलीतील अवैध धंदेवाईकांवर बेधडक कारवाई करून लगाम घातला.
आतापर्यंत त्यांनी नागपूर शहर,भिलवडी ,गडहिंग्लज पोलीस ठाणेकडे उलेखनिय असे काम पाहिले असून आता त्यांची बदली आजरा पोलीस ठानेकडे झाली आहे. यावेळी शेतकरी संघ व कारखाना संचालक सुधीर देसाई तसेच देवकांडगाव चे सरपंच सुनील देसाई यांचे हस्ते सत्कार झाला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघ शाखा आजरा अध्यक्ष मायकेल फर्नांडिस, के. डी. सी. बँकेचे आजरा विभागीय अधिकारी सुनील दिवटे, ऍग्री ओव्हरसिअर जनार्दन देसाई यांचे हस्ते सत्कार झाला.