ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजिंक्य देसाई यांचा “महाराष्ट्र युवा समाजरत्न” पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर प्रतिनिधी :

परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी, एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन व अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने विद्यमाने महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात असाधारण प्रतिमा निर्माण करणाऱ्या रत्नविरांना सन्मानित करण्यात आले.

आपल्या ‌कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या सहकार्यामुळे कार्य करत असलेले आजरा तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते कु.अजिंक्य देसाई यांना “महाराष्ट्र युवा समाज रत्न ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते सन्मानित केले यावेळी निवड समिती अध्यक्ष संदिप राक्षे(सिनेमा निर्माता), शिवकन्या अर्चना पारडे, डॉ. गंगाधर व्हनकोटी, बाळकृष्ण गोरे आदी मान्यवर उपस्थित होते .

रक्तदान‌ शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, मतदान‌ जनजागृती, गोरगरिबांना मदत, , गडकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम , विविध सामाजिक संस्थेत काम, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, श्वाश्वत विकासाकरिता गाव दत्तक घेवून ग्रामविकास,‌पाणी फौंडेशनच्या पाणीदार शिवार चळवळीत विशेष काम, राष्ट्रीय सेवा योजनेतील राज्य स्तरावरील शिबीरात सहभाग, वृक्षारोपण‌ , सेंद्रिय शेती काळाजी गरज यावर जनजागृती , कोविड काळात सर्व सेवा गरजूलोकांसाठी मिळाव्या यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, या सारखी विविध कामे करून समाजात सामाजिक परिवर्तनाची प्रतिमा निर्माण करुन. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आदर्श समाजसेवेची राजमुद्रा उमटवली आहे. अजिंक्यला मिळालेल्या पुरस्कारामुळे अजिंक्यचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks