ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदमापूरचे सरपंच विजयराव गुरव यांनी वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आदमापूर (ता. भुदरगड) येथील राजेंद्र पाटील यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे घरचा कर्ता पुरुषच नियतीने हिरावून नेल्यामुळे त्यांचे कुटूंब वाऱ्यावर आले आहे.आदमापूर येथील सरपंच विजयराव गुरव यांनी सामजिक बांधिलकी मानत आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पाच हजाराची मदत या कुटूंबियांकडे सुपूर्त केली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने महिन्याला तेल डबा देण्यात आला.

सरपंच विजयराव गुरव हे संवेदनशील असून समाजात घडणाऱ्या घटना त्यांना वेदना देतात, श्री बाळूमामांच्या कृपेने सर्वांचे चांगले व्हावे. हा त्यांचा मनोदय असतो. गेली तीस वर्षे मी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे कार्यरत आहे श्री बाळूमामा फाउंडेशन या संस्थेमार्फत रक्तदान, कन्या ताक वाटप, बाळूमामा श्री पुरस्कार, अन्नछत्र इत्यादी उपक्रम उपक्रम राबवत आहेत. वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च न करता अनेक सामाजिक उपक्रमांना मदत केली आहे.

गावातील राजेंद्र पाटील यांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे. यामुळे श्रीमती सरिता यांना वैध्यव्य प्राप्त झाले आहे. त्यांचा मुलांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी पाच हजाराची मदत दिली आहे. गावचा उदयोमुख पै. पवन पाटील याने ही मदत केली आहे. माझी फार मोठी मदत नसली तरी त्या पाठीमागची मानवतेची भावना मोठी आहे. अशा निराधार कुंटुबाच्या पाठीशी इतरांनी उभे राहवे, असे आवाहन केले.

यावेळी उपसरपंच सौ. राजनंदिनी भोसले, सदस्य अमर पाटील, प्रकाश खापरे, सौ. मालुताई पाटील, सौ मंगल पाटील, सौ. मनीषा पाटील, सौ. सुमन गुरव, ग्रामपंचायत अधिकारी पी. पी. बोंगाडे यांच्यासह सुनील पाटील, सचिन पाटील, कृष्णात पाटील, विकास पाटील व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks