ताज्या बातम्यानिधन वार्तामनोरंजन
अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराने निधन

मुंबई :
अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरुवारी निधन झालं. कूपर इस्पितळातून त्याच्या निधनाच्या बातमीची पुष्टी देण्यात आली. ४० वर्षीय अभिनेत्याचा हृदयविकाराने निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.