आजऱ्यातील कार्यकर्त्यांनी माझी पाठराखण केली : आमदार राजेश पाटील यांचे मत

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व नेतेमंडळींनी माझी पाठराखण केली, तसेच ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब, उप मुख्यमंत्रीअजित दादा पवार, माजी आमदारआईसाहेब संध्यादेवी कुपेकर यांनाही कार्यकर्त्यानी सांगितले कि राजेश साहेबाना उमेदवारी द्या, आम्ही त्यांना निवडून आणू… हे अभिवचन कार्यकर्त्यानी सार्थ ठरवले.
त्यांना पोच विकासासाठी निधी देऊन केली पाहिजेत असे मत आमदार राजेश पाटील यांनी हंदेवाडी (ता.आजरा) येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्त व्यक्तींच्या सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी ब्रम्हा विकास मंडळ मुंबई चे आनंदराव मटकर होते स्वागत एन डी रेडेकर यांनी केले प्रास्ताविक मॅनेजर जनार्दन बामणे यांनी केले यानंतर बोलताना आमदार राजेश पाटील यांनी उचंगीचा प्रकल्प मार्गी लावून मे अखेर पाणी अडविणार असल्याचे सांगितले. तसेच के डी सी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अस णाऱ्या विविध योजना पोचविणार असल्याचे सांगितले हंदेवाडी ते सुळे या उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरण चे व ब्लॉक मधील सांस्कृतिक हॉलचे उदघाटन आमदार राजेश पाटील यांनी केले.
यानंतर बोलताना के. डी. सी. सी. चे नूतन संचालक सुधीर देसाई म्हणाले की शासनाच्या योजना तसेच बँकेच्या विविध योजना सभासद ,ठरावधारक ,व संस्थापर्यंत पोचविणार असल्याचे सांगितले हंदेवाडी ग्रामस्थ तसेच ब्रम्हा विकास मंडळ मुंबई याचे वतीने नूतन संचालक सुधीर देसाई,आमदार राजेश पाटील,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा,माजी सरपंच सुभाष देसाई,मधुकर,एल्गार,उद्योजक बाबुराव रेडेकर,यांचा सत्कार झाला तर सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर हेब्बाळकर,सुरेश शिंदे यांचाही यावेळी सत्कार झाला यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य एम डी कदम, मधुकर हेब्बाळकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ठेकेदार आण्णाप्पा पाथरवट,विष्णू रेडेकर,रमेश कदम,महादेव फडके,गणपत जाधव,पोलीस पाटील पुंडलिक फडके,संतोष सुतार,महिलावर्ग ,ग्रामस्थ उपस्थित होते.