ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ACCIDENT :: बटकणंगले येथे अपघातात एक जण ठार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
गडहिंग्लज ते नेसरी रोडवर बटकणंगले गावच्या हद्दीत महिंद्रा 12 चाकी ट्रक नं के ए 22,सी 7642 च्या टायर खाली सापडून सलीम मौला नाईकवडी वय 39 वर्ष रा संकेश्वर हे बुधवारी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान जागीच ठार झाला.
अधिक माहिती अशी की, सलीम नाईकवडी हे एक पाय बाहेर काढून बसलेले असताना ट्रकमधून पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही इम्तियाज अहमद अलाउदिन नाईकवडी वय 46 रा चिकोडी याने तशा अवस्थेत हयगयीने ट्रक चालवून त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेने मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे नेसरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पो कॉ संजय कांबळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास स फौ गुरव करीत आहेत.