ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
एरवी वाढदिवस म्हंटल की नको त्या ठिकाणी प्रचंड पैसा उधळून मोठेपणाचा आव दाखवला जातो परंतू मुरगुड (ता.कागल) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी आंबेडकर नगरमधील अंगणवाडीतील मुलांच्या चेह-यावरील आनंदातच आपला आनंद शोधला.व आपला वाढदिवस लहान मुलांसोबत खाऊ वाटप करून वाढदिवसाला सुद्धा सामाजिक कार्याची किनार जोडून इतरांपुढे आदर्श ठेवाला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे , वैभव कांबळे ,हरीश कांबळे,गिरीश कांबळे यांचेसह विद्यार्थी, शिक्षका उपस्थित होते.