ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापुरातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी महिला पोलिस चालकाने केलं उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचं सारथ्य

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तृप्ती यांचे वाहन चलाविण्याचं कौशल्य वाख्याण्याजोगं असून त्यामधून राज्यातील तरुणींना नक्कीच प्रेरणा मिळेल, असं म्हणत तृप्ती यांचे कौतुक केले.

NIKAL WEB TEAM :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . त्यावेळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य महिला पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक यांनी केले. त्यामुळे अजित पवारांसह सतेज पाटील यांनी देखील या महिला कर्मचाऱ्याचं कौतुक केलं.
तृप्ती मुळीक या मूळच्या कोल्हापुरातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी आहेत.

त्या पोलिस कॉन्स्टेबल असून त्यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी व्हीआयपी सिक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत.

आज व्हीआयपी वाहनचा चालक म्हणून त्यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. याचदिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्याची संधी तृप्ती यांना मिळाली.

सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तृप्ती यांचे वाहन चलाविण्याचं कौशल्य वाख्याण्याजोगं असून त्यामधून राज्यातील तरुणींना नक्कीच प्रेरणा मिळेल, असं म्हणत तृप्ती यांचे कौतुक केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks