एक राखी जवानांसाठी.. मुरगुड विद्यालयात स्तुत उपक्रम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड ता. कागल येथे एक राखी जवानांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे . या उपक्रमांतर्गत माध्यमिक विद्यालय, व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनीनी नारळी पौर्णिमा- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राख्या संकलन करायचे काम केले. संकलित केलेल्या राख्या प्राचार्य एस. पी. पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. सदरच्या संकलित केलेल्या सर्व राख्या एनसीसी ऑफिस कोल्हापूर येथे पाठविण्यात आल्या.
यावेळी उप मुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य व्ही.जी.घोरपडे, एम.डी खाटांगळे पर्यवेक्षक एस.डी.साठे, पी बी लोकरे, एनसीसी विभाग प्रमुख सुखदेव लोकरे,वाय.ई.देशमुख, प्रा. टी एस पाटील, यू .पी.कांबळे,व्ही.एस.सुर्यवंशी,बी.वाय.मुसाई,ए.एम.कोळी,एस.आर.भोई,के.एस.पाटील,नंदा सारंग,सविता गावडे,सुप्रिया बाईत, एल. के. पाटील,शामली डेळेकर,एस.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रा. एस एस पाटील यांनी तर आभार प्रा. एस एल डेळेकर यांनी मानले.