मंदिरात पुजेची तयारी करुन शेताकडे गेलेल्या पुजाऱ्याचा मानेवर भारा पडून मृत्यू, घटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या घटनेने बोरवडे परिसरात हळहळ

बिद्री प्रतिनिधी :
आजच्या घटस्थापनेच्यादिवशी मंदिरात पुजेची तयारी करुन शेताकडे गेलेल्या पुजाऱ्याचा मानेवर भारा पडून मृत्यू झाल्याची घटना बोरवडे ( ता. कागल ) येथे घडली.जोतिराम शामराव गुरव ( वय ४२ ) असे या पुजाऱ्याचे नाव असून, ऐन दसऱ्याच्या तोंडावरच घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुजारी गुरव हे ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरात पुजाअर्चा करतात.आज घटस्थापना असल्याने ते मंदिरात पुजेची तयारी करुन शेताकडे गेले होते.शेतातून वैरणीचा भारा घेवून येत असताना मानेवर भारा पडून गुरव यांचा मृत्यू झाला.
शांत व मनमिळावू स्वभावाच्या जोतिराम यांनी ग्रामस्थांत आदराचे स्थान मिळवले होते. ऐन घटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.