सातेरी-महादेव डोंगरी पर्वतरांग परिसरात वृक्ष चळवळीद्वारे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्याकरिता वृक्ष लागवडीचा राबविला नवा उपक्रम

सावरवाडी प्रतिनिधी :
सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीतील पर्याटन क्षेत्र असलेल्या आणि नैसगिक सौदर्य लाभलेल्या करवीर तालुक्यातील सातेरी महादेव परिसरात पर्यावरण संतुलनाबरोबर नैसर्गिक सौदर्य वाढविण्यासाठी या परिसरात रविवारी सकाळी वृक्षारोपन चळवळीचा उपक्रम राबविण्यात आला.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील प्राचीन ऐतिहासिक सातेरी – महादेव डोंगरी भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी राजेंद्र सुर्यवंशी युवा मंच, पश्चिम भाग वृक्ष चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षचळवळ उभारण्यात येत आहे. पर्याटन क्षेत्र परिसरातील रस्ते , शासकिय पडीक जमिनीमध्ये विविध जातीचे जंगली वृक्ष लावण्यात येत आहे.
सातेरी – महादेव तिर्थक्षेत्राच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी दोन वर्षापूर्वी हरित टेकडी योजनेतून दोन हजार वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन ही करण्यात आले होते . उर्वरित जमिनीमध्ये व मुख्य वाहतुकीच्या रस्त्यानजीक झाडे लावण्याचा उपक्रम पार पडला.
या वृक्ष लागवड मोहिमेत करवीर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजेंद्र सुर्यवंशी ,रयत कृषि संघाचे संचालक कुंडलीक पाटील , बाबुराव जाधव बाळासाहेब नलवडे , मारुती कंदले , संदीप सुतार , संग्राम भोपळे , ज्ञानदेव जाधव , नामदेव यादव मधुकर नलवडे सुरज पाटील , रामदास पौंडकर, विष्णू यादव, महेश संकपाळ आदि वृक्षप्रेमी मान्यवर उपस्थितीत होते.
“सातेरी महादेव डोंगरी प्रदेशाचे नंदनवन करू “
करवीर तालुक्याच्या पर्याटन क्षेत्रात वैभव प्राप्त करणाऱ्या सातेरी महादेव पर्यटन क्षेत्र परिसरात पर्यावरणाच्या दृष्टी कोनातून वृक्षारोपन कार्यक्रम राबवून या परिसराचे नंदनवन करू त्यासाठी तरुणांचा पुढाकार हवा.
राजेंद्र सुर्यवंशी (माजी सभापती व विद्यमान सदस्य करवीर प.स.)