रवळनाथ पतसंस्थेला १५ लाखांवर नफा : अध्यक्षा सौ. फडके आजऱ्यातील रवळनाथ पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा, ता. ३० (प्रतिनिधी) :
आजऱ्यातील रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात १५ लाख ९ हजार १०२ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांच्या मागणीप्रमाणे सभासदांना १२ टक्के लाभांश देणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा फडके व उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी जाहीर केले. संस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा फडके होत्या. तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी होते.
संस्थेच्या सभागृहात ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन ८ अध्यक्षा सौ. सुरेखा फडके यांनी करुन प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांच्या हिताची जपणूक होईल अशा दृष्टीने संस्थेने धोरण आखून संस्थेचा कारभार सुरु असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अध्यक्ष सौ. सुरेखा फडके, उपाध्यक्ष किरण कांबळे, मॅनेंजर विश्वास हरेर यासह संचालक मंडळाने दिली. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत गोविंद गुरव, चंद्रकांत गुरव, इब्राहिम इंचनाळकर, सिकंदर दरवाजकर यासह सभासदांनी भाग घेतला. सभेत संस्था इमारतीवर सभागृह बांधण्याकरिता सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
सभेत ६५ वर्षे पुर्ण झालेले सभासद, दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी श्रीधर सावरतकर, नवोदयसाठी निवड झालेबद्दल चिन्मय नार्वेकर, निवडीबद्दल शिवाजी लाड, जि. प. चा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन कळेकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी म्हणाले, सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होणे, थकबाकी न राहणे याकडे लक्ष देण्याबरोबरच सभासदांच्या मागणीनुसार कर्जासाठी कमीत कमी व्याज आकारणी करता येण्याकरिता प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले.
सभेला आजरा महाल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासो पाटील, एस. पी. कांबळे, सुनील देसाई, के. जी. पटेकर, मारुतीराव देशमुख, विलास पाटील यासह संचालक सुधीर नार्वेकर, समीर गुंजाटी, मजीद मुराद, युसूफ गवसेकर, अभिषेक शिंपी, विलास कुंभार, बाबासो गावडे, पांडूरंग नांदवडेकर, सौ. रंजना नेवरेकर यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन पल्लवी नार्वेकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी मानले. सभा यशस्वी करण्यासाठी अनिल नार्वेकर, रुपाली सावळगी, दिनकर गिलबिले व आनंदा कांबळे यांनी परिश्रम घेतले.