बरगेवाडी येथे साजरा झाला गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम; रोहन बरगे यांचा कौतुकास्पद कार्यक्रम

कौलव प्रतिनिधी :
समाजामध्ये आपण आज पाहतो की ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो पण राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी या छोट्या गावांमध्ये अवघ्या वीस वर्षाच्या रोहन बरगे यांनी मुक्या प्राण्याविषयी आदर प्रेम व्यक्त करणारा गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न केला आहे या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी या खिलार गाईचे पूजन आणि ओटी पूजन केले. एकीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी तर दुसरीकडे जनावरांचे संगोपन हा रोहनचा आवडता छंद असुन शाहूनगर परिते येथील गणेश हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर सूर्याजी गणपतराव पाटील यांनी विनामूल्य किमतीत या खिलार पाडी ची संगोपन करण्याची जबाबदारी रोहन बरगे यांच्यावर सोपवली आपण घेतलेल्या जबाबदारीला कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता अगदी प्रेमाने खिलार पाडी चे संगोपन केले आणि बघता बघता खिलार गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम समोर आला आज तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
या कार्यक्रमावेळी माजी उपसरपंच सुभाष बरगे, नागेश्वर दूध संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी बरगे, नामदेव बरगे, संजय बरगे संदीप कारंडे , संदीप बरगे सह महिलावर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.