कोल्हापूर : सामाजिक बांधिलकीने तरुणाना प्रेरणा देणारा वाढदिवस

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
हस्तिनापुर नगरीतील सुशील शिवाजी भोसले यांनी आज आपला 27 वा वाढदिवस समाजाला व तरुणांना प्रेरणा देणारा नक्कीच ठरेल यांनी आपला वाढदिवस साधेपणाने करून जिल्हा परीवीक्षा व अनुरक्षण संघटना कोल्हापूर बालकल्याण संकुल या मधील अनाथ मुलांसाठी बिस्किटे कडधान्य ,डाळी , तांदूळ कोलगेट अशा विविध वस्तू देऊन साजरा केला त्यावेळी बालकल्याण संकुल च्या क्लार्क स्मिता वायचळ मॅडम यांच्याकडे या वस्तू सुपुर्त करण्यात आल्या यावेळी सुशील चे वडील श्री शिवाजी भोसले सर शिवाजी शिंदे , रणजीत खरात, प्रफुल पाटील हरीश सलगर सलमान शेख अक्षय कांबळे निखिल अल्गुर अमोल बेलेकर आधी मित्रपरिवार उपस्थित होता तसेच यल्लमामंदिर येथे भिक्षा मागून पोट भरणारे कुष्ठरोगी यांना नाश्ता देऊन आपण या समाजाची बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असाच तरुणांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने करून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपण गरजूना लोकांना दानधर्म करून आपला वाढदिवस साजरा करावा असा संदेश त्यांनी दिला