ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नियमित बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करावी ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कागल आगार येथे व्यवस्थापक यांना निवेदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी नियमित बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करावी असे निवेदन कागल आगार व्यवस्थापक प्रमुख सागर पाटील यांना निवेदन दिले.
नियमित चिखली मुक्काम बस सेवा सुरु करणेबाबत व नियमित शाळा सुरु होत आहे .या गावातून ये – जा करणारे १५० विद्यार्थी आहेत सदरचे विद्यार्थी यमगे , सुरुपली, कुरुकली सोनगे , बस्तवडे हमिदवाडा या गावातून नियमित येतात .चिखली मुक्काम असणारी बस पूर्ववत प्रमाणे सुरु व्हावी व विद्यार्थीचे नुकसान टाळावे व सहकार्य करावे असे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील, संदीप बोभाटे, प्रकाश दाभोळे,बाॅबी बालेखान आदी उपस्थित होते.