ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : एमबीबीएसनंतर होणार आता ‘नेक्स्ट’ परीक्षा , याच वर्षी जुलै महिन्यात एम्स घेणार मॉक टेस्ट

नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) पुढच्या वर्षापासून देशात पदवीधर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट (नॅशनल एक्झिट टेस्ट) लागू करणार आहे. याचे प्रारूप निश्चित करण्यात आले आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी जुलैमध्ये देशभरात मॉक टेस्ट घेतली जाईल. याची अधिसूचना जूनमध्ये जाहीर होईल. ही माॅक टेस्ट दिल्ली एम्स घेईल.

दिल्लीमध्ये १४ जून रोजी एनएमसीच्या १०व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला देशभरातील एनएमसीचे ३३ सदस्य उपस्थित होते. नेक्स्ट लागू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे संपूर्ण करिअर याच परीक्षेच्या गुणांवर अवलंबून राहणार आहे. पीजी जागेपासून ते नोकरीपर्यंतचा निर्णयही नेक्स्ट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच घेतला जाईल. नेक्स्ट दोन टप्प्यात घेतली जाईल. एमबीबीएसच्या दुसऱ्या भागात नेक्स्ट-१ थेअरी असेल. नेक्स्ट-२ प्रॅक्टिकल असेल. ती इंटर्नशिपनंतर होईल.

कधी होणार परीक्षा ?

नेक्स्ट १ : दरवर्षी मे व नोव्हेंबरमध्ये.

नेक्स्ट २ : दरवर्षी जून व डिसेंबरमध्ये.

नीट पीजी परीक्षा संपुष्टात येणार

नेक्स्ट लागू होण्यासोबतच देशामध्ये नीट पीजी परीक्षा घेण्याची व्यवस्था संपुष्टात येईल. नेक्स्टमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना पीजी सीट मिळू शकेल. पीजीची स्वतंत्र परीक्षा आता होणार नाही. नेक्स्ट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांची आरएमसी किंवा एनएमसीमध्ये नोंदणी केली जाईल. तसेच एफएमजीचे विद्यार्थीही यानंतर तात्पुरती नोंदणी करू शकतील. संपूर्ण भारतामध्ये नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारेच सरकारी नोकरी मिळवण्यास पात्र ठरू शकतील. स्कॉलरशिप आणि फेलोशिपमध्येही याच गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks