गटतट न पाहता संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला : राजे समरजितसिंह घाटगे ; शासन आपल्या दारी अभियानातील मंजूर लाभार्थ्यांना पत्र वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल विधानसभा मतदारसंघात याआधी संजय गांधी,श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गट बघून लाभ दिला जात होता. मात्र आपण गट-तट न पाहता या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी या अभियानामध्ये मंजूर झालेल्या कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटप वेळी ते बोलत होते. यावेळी ३३८ लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप केले. तसेच राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून प्रत्येकी वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ही मंजुरी पत्राची वाटप केले
श्री घाटगे पुढे म्हणाले कागल तालुका वगळता संपूर्ण राज्यात यापूर्वी या लाभार्थ्यांना पेन्शन शासनामार्फत खात्यावर जमा केली जात होती. मात्र कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना रोखीने वाटप करताना लाभार्थ्यांवर अन्याय होत होता. मात्र आपण ही रोखीने पेन्शन वाटप बंद करून खात्यावर जमा करण्यासाठी शासन पातळीवर यशस्वीपणे प्रयत्न केले. आता राजे बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन दिली जात आहे. या लाभार्थ्यांना शासनाच्या इतर विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
स्वागत अरुण गुरव यांनी केले. आभार प्रा.सुनील मगदूम यांनी मानले.