सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध ; खास. मंडलिक यांचे मुत्सद्दी व कुशल नेतृत्व

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकिय व्यासपीठ असा गौरव असलेल्या कागल तालुक्यातील सध्याच्या संघर्षमय व संवेदनशिल राजकिय परिस्थितीत लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याची सन २०२३ ते २०२८ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करुन खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या मुत्सद्दी व कुशल नेतृत्वाची ओळख जिल्हाभर केलेली आहे. यापुर्वीची सन 2017 ते 2022 ची पंचवार्षीक निवडणूक सुध्दा बिनविरोध झालेली होती.
तालुक्यातील सर्व मान्यवर नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, सभासदांचे मंडलिक कुटूंबावर असलेला विश्वास व कार्यकर्त्यांनी दिलेली साथ या बळावर खासदार मंडलिक यांनी २०१७ ते २०२२ व
२०२३ ते २०२८ अशी सलग दुसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करुन दाखविलेली आहे.
कारखाना बिनविरोध निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रसिध्दी पत्रकांच्या माध्यमातुन खासदार संजय मंडलिक यांनी संवाद साधला आहे. खास. मंडलिक म्हणाले साखर कारखाना हे लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जिवंत स्मारक आहे. त्यामुळे त्याचा उत्कर्ष होण्याच्या प्रवासात निवडणूक बिनविरोध होणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. साखर कारखानदारी असो की सहकार सध्या अडचणीतून वाटचाल करत आहे. अशावेळी निवडणूकीची चैन कारखानदारीला परवडणारी नाही. त्यामूळे या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन आपण केले होते. याला आमदार हसन मुश्रीफ , छत्रपती शाहु कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, युवराज (बापू) पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हि निवडणूक बिनविरोध होणे सोपे झाले. याबद्दल त्या सर्वांचे मी व नुतन संचालक मंडळ आभार मानतो.
याबरोबरच कारखान्याचे सर्व सभासद, बंधू-भगिनी यांनी देखील या बिनविरोध निवडणूकी साठी समजूतदार भूमिका घेतली.त्यांनी देखील या बिनविरोध प्रक्रियेस चांगले पाठबळ देवून विश्वास दाखवला . त्यामुळे बिनविरोध निवडणूकीचा मार्ग सुकर झाला . त्यांचेही मी मन:पुर्वक आभार मानतो.
तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देतांना कारखान्याचे विद्यमान व ज्येष्ठ संचालकांनी देखील अगदी मोठ्या मनाने आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले त्यांचा देखील मी ऋणी आहे.नवीन तसेच विद्यमान अशा सर्व नवनिर्वाचीत संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो. कारखान्याच्या उत्कर्षासाठी या सर्वांनी सहकार्य व वेळ द्यावा व लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी या सहकार मंदिराला जे वैभव प्राप्त करुन दिले . त्यासाठी आपण सर्वजण मिळून कार्यरत राहुया असे आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे.
बिनविरोध उमेदवार असे :
उत्पादक गट मुरगूड – चेअरमन खा. संजय मंडलिक , संभाजी मोरे व तुकाराम ढोले,उत्पादक
गट बोरवडे -आनंदा फराकटे , कृष्णा शिंदे , सत्यजित पाटील ,
उत्पादक गट कागल – धनाजी बाचणकर , शिवाजीराव इंगळे , महेश घाटगे ,
उत्पादक गट मौजे सांगाव – कैलास जाधव , प्रकाश पाटील , मंगल तुकान ,
उत्पादक गट कापशी सेनापती – पुंडलिक पाटील , विश्वास कुराडे , प्रदिप चव्हाण
बिगर उत्पादक संस्था गट – विरेंद्र मंडलिक,
अनुजाती व जमाती गट -चित्रगुप्त प्रभावळकर ,
भटक्या जाती व जमाती गट – विष्णु बुबा,
महिला गट – सौ. नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे , सौ.प्रतिभा भगवान पाटील
इतर मागास वर्ग – नेताजी बळवंत पाटील