राज्य सरकारचा भाविकांना दिलासा ! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ

सध्या तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण पंढरीच्या वारीचा आनंद लुटत आहेत. अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक वारकऱ्याांना गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येने नुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, सांबांधीत आर.टी.ओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओमध्ये 13 जून पासून टोलमाफीचे स्टीकर्स उपलब्ध होणार आहेत.
पंढरपूरला जाताना आणि पुन्हा पंढरपूरवरून येताना 13 जून 2023 पासून ते 3 जुलै 2023 पर्यंच टोलमाफीची सवलत लागू असणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. ही सवलत पालखी, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असणार आहे.