गडहिंग्लज : हडलगेत सेवानिवृत्त जवान रवींद्र नाईक यांचा सत्कार

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
हडलगे ता.गडहिंग्लज चे सुपुत्र व भारतीय सैन्यदलाचे जवान रवींद्र शंकर नाईक हे सैन्यदलातून 17 वर्ष उलेखनिय अशी सेवा बजावून ते 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झालेबद्दल त्यांचा सत्कार सोहळा पार पडला श्री रवींद्र नाईक हे सैन्यदलात सोल्जर जी डी या पदावर 23 मे 2006 ला बेळगाव एम एल आय रेजिमेंट सेंटर ला भरती झाले व येथेच त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती गुजरात जामनगर येथे झाली
यानंतर त्यांनी मणिपूर इंफाळ,कानपुर,मच्छर सेक्टर,तंगधार,पठाण कोट, बेळगाव, सिक्कीम,नथुला चायना बॉर्डर,धाना एम.पी.,व शेवटी बेळगाव येथून लान्स नायक पदावरून 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले 12मराठा एल आय धाना येथे त्यांचा सत्कार झाला होता सेवनिवृतिनिमित त्यांची सजविलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली तर क्लासमेंट ग्रुप,आजी माजी सैनिक संघटना ,ग्रामपंचायत, शंकरराव शिंदे हायस्कुल,क्रांतिवीर उमाजी नाईक मंडळ,स्वामी समर्थ पतसंस्था, हडलगे यांच्या वतीने त्यांचा सत्कार पार पडला
यावेळी सरपंच हणमंत पाटील,उपसरपंच सौ अरुणा पाटील,ग्रामसेवक श्री पाटील ,पो.पा.मल्लाप्पा नाईक यांचेसह सर्व ग्रामस्थ,सर्व मंडळांचे पदाधिकारी व सदस्य हजर होते त्यांच्या जीवनप्रवासात वडील कै. शंकर नाईक यांचा आशीर्वाद लाभला तर आई श्रीमती पार्वती,पत्नी सौ सरिता ,मुलगा शौर्य,मुलगी रुचिता ,बहीण सौ सुशीला परशुराम तळवार ,दाजी परशुराम तळवार, भाचे स्वप्नील ,संदेश ,भाऊ राजाराम नाईक माजी सैनिक यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले