शाहू हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा स्मृतीदिन

कोल्हापूर:
जुना बुधवार पेठ येथील शाहू महाराज हायस्कूल मध्ये संत गाडगेबाबा स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी संत गाडगेबाबा यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक जे आर जोशी यांनी स्वच्छतेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली तसेच या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे प्रयोग सादर केले या कार्यक्रमास संस्थेचे आजीव सेवक मा.श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक जे आर जोशी, ज्येष्ठ शिक्षिका सौ.मीना मोहिते, एस पी घोडके,व्ही एस चव्हाण-पाटील, पी.बी कुंभार,बी एस कांबळे बी.जे सावंत तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते