मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?

सोलापूर:
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार आहे. ही फुटीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे, असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोललं जातंय कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळं शिजवून झालेलं आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
तुम्ही काळाजी करू नका. नेत्याच्या हातात आता काही राहिलं नाही. सगळं पोरांनी केलंय. प्रत्येक गोष्ट राज्यात इथून पुढे ओकेचं होणार आहे. 170 आमदार शिंदे फडणवीस यांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.