ताज्या बातम्या
कागणी येथे नवरात्रोत्सवानिमित आजी माजी सैनिकांचा सत्कार

कोवाड प्रतिनिधी
कागणी येथे नवरात्र उत्सवा दरम्यान कागणीतील सर्व आजी माजी सैनिक यांचा सत्कार सोहळा जय हनुमान जिम मंडळातर्फे ढोल ताशाच्या गजरात मानवंदना देऊन संपन्न झाला प्रास्ताविक श्री श्रीकांत सुळेगावकर सर यांनी केले या समारंभात 1971 भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतलेली सैनिक तुकाराम देसाई परशुराम तारळकर तसेच सुभेदार वैजनाथ बाचुळकर सुभेदार प्रताप देसाई कॅप्टन सुबराव भोगण सुभेदार दशरथ मुरकुटे अशी एकूण 35 माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराचे नियोजन पुरुषोत्तम सुळे भाऊकर योगेश जांभळे शंकर पुजारी बाळू कुदनुरकर मोहन सुळे भोकर गोवर्धन पुजारी व तरुणांनी भव्य नियोजन केले होते गावातील सर्व नागरिक महिला सोहळा पाहण्यासाठी आवर्जून आले होते आभार प्रदर्शन कॅप्टन सुबराव यांनी केले व ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रम संपन्न झाला