शिवसेनेतर्फे मुरगूड पोलिसांचे कौतुक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून गणपती सणावर निर्बंध लावण्यात आले होते. पण या वर्षी शासनाकडून निर्बंध शिथिल केले गेले. यामुळे सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. यात मुरगूड पोलिस ठाण्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत उत्साही वातावरण निर्माण केले तसेच कार्यक्षेत्रातील ५४ गावांत गणेशोत्सव काळात अनुचित प्रकार व कोणताही वादविवाद न “होता मोठ्या उत्साहात साजरा झाला. याबद्दल कागल तालुका शिवसेनेच्या वतीने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, इतर अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या दक्ष, सुसज्ज यंत्रणेमुळे गणेशोत्सव शांततेत पार पडला. याबद्दल कागल तालुका शिवसेनेच्या वतीने पोलिस ठाण्यात
पोलिस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मारुती पुरीबुवा, विभागप्रमुख विजय पाटील, दिग्विजय पाटील, अवधूत डवरी व शिवसैनिक उपस्थित होते.