हिंडगाव येथे चित्रकला स्पर्धा उत्साहात

चंदगड प्रतिनिधी
KLES डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर बेळगाव मार्फत आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्य या विषयासाठी दिनांक 22 सप्टेंबर रोजी विद्या मंदिर फाटकवाडी या प्राथमिक शाळेमधे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमधील यशवंत विद्यार्थ्यांना शिल्ड व सहभागी विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल व रंगपेटी तसेच शाळेसाठी पृथ्वीगोल व धन्वंतरीची मूर्ती भेट दिली.
हॉस्पिटलचे कॅम्प को- ऑरडिनेटर श्री दीपक अरबळी सरांनी मुलांना स्वच्छता आणि आरोग्याविषयी माहिती दिली.
या प्रसंगी फाटकवाडी ( हिंडगाव )गावचे सरपंच सौ. पुनम फाटक, उपसरपंच श्री. विनायक खांडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सचिन दळवी, सामाजिक कार्यकर्ते श्री माणिक देशपांडे. संजय भातकांडे. KLES हॉस्पिटलचे PRO संदिप गावडे, सुनिल शिंदे, रोहित पाटील, सुनिल वायदंडे, दिपक बचनेट्टी ( आरोग्य मित्र ) उपस्थित होते.