ताज्या बातम्या

निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर,: निर्यातदारांनी त्यांच्या निर्यात वाढीसाठी आवश्यक असणा-या बाबींचा कृती आराखडा तयार करुन निर्यात प्रचलन समितीस द्यावा. समितीमार्फत त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच निर्यातदारांसाठी खरेदीदार आणि विक्रीदार यांच्यात समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.  

महाराष्ट् शासनाच्या उद्योग विभाग जिल्हा उद्योग केंद्र व स्मॉल इंडस्ट्जि डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया सिडबी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे दोन दिवशीय प्रदर्शन कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्हयातून निर्यात वाढावी या उद्देशाने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. निर्यातदारांना ही उज्ज्वल संधी असून त्यांनी याचा लाभ घ्यावा. 

     दिवसभर चाललेच्या कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरील निर्यात सल्लागार मिहीर शहा यांनी निर्यातदारांना सहज सुलभ निर्यात करता यावी, निर्यातदाराची नोंदणी, उत्पादन निवड, निर्यातीसाठी बाजारपेठ निवडणे, आयातदार ग्राहक कसे शोधावेत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सल्लागार केशव ताम्हणकर यांनी विविध विभागात निर्यातीच्या संधी तसेच निर्यातदारांना निर्यातवृध्दीसाठी प्रोत्साहन या विषयावर उपस्थित निर्यातदारांना मार्गदर्शन केले.   

कार्यक्रमात निर्यातदार स्टॉलधारकांचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून बारा उत्पादकाना गौरविण्यात आले. तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी हर्षद दलाल आणि संजय पेंडसे यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

  कार्यक्रमास बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्, नाबार्ड, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील, निर्यातदार उत्पादक यामध्ये कोल्हापूरी चप्पल, गुळ व पदार्थ, तांदूळ, कपडे, चांदीचे दागिने, अग्निरोधक उपकरणे, मातीच्या कलात्मक वस्तू, महिलांचे दागिणे व गृहउपयोगी वस्तूं छोटेखानी प्रदर्शन भरविले आहे.  

प्रदर्शन कमी वेळेत अतिशय नियोजनबध्द करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके, व्यवस्थापक मंजुषा चव्हाण, दुर्गा पाटील, प्रसाद काटाळे, सतिश जाधव, सुरेश सरंजामे, प्रशांत चव्हाण, नाबार्डचे श्री.अशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक गणेश गोडसे, सिडबी बॅंकेचे व्ही.प्रसाद, सह महाव्यवस्थापक बॅंक ऑफ इंडियाचे किरण पाठक यांनी सहकार्य केले. 

यावेळी निर्यातदार उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks