ताज्या बातम्या
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी करवीर तहसीलदार शीतल मुळे- भामरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
यानंतर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याशी चर्चा केली. तसेच मंदिराच्या विकास कामांचा आढावा घेऊन याबाबत लवकरच बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले.