बिद्रीत २ रोजी आपत्कालीन रेस्क्यू फोर्स भरतीचे आयोजन

बिद्री ता. २९ ( प्रतिनिधी: अक्षय घोडके ) :
बिद्री येथील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या आपत्कालीन रेस्क्यू फोर्समध्ये युवक युवतींसाठी भरतीचे आयोजन केले आहे. रविवार दि. २ ऑक्टोंबर रोजी या भरतीसाठी शारीरीक चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख दत्तात्रय वारके यांनी दिली आहे.
स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सेवाभावी तत्वावर रेस्क्यू फोर्स चालवले जाते. यामध्ये काम करणाऱ्या तरुण – तरुणींना सैन्यभरती, पोलिस भरतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले जाते. रविवार दि. २ रोजी दूधसाखर महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ९ वाजता शारीरीक चाचणीचे आयोजन केले आहे. उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण आणि त्याचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. येताना आधारकार्ड , बँक पासबुकची झेरॉक्स, पोलिस पाटलांचा वर्तणुकीचा दाखला आणणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी संस्थेचे प्रमुख दत्तात्रय वारके मोबाईल ९४२१२०१४५३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे