ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामदैवत अंबाबाई मंदिर सुशोभीकरणासाठी भरीव निधी देवु : आमदार हसन मुश्रीफ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड ता. कागल येथील अंबाबाई मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी आपण कोट्यावधी रुपयाचा निधी आतापर्यंत दिला आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्याने मी समाधानी आहे. मा.प्रविणसिंह पाटील यांच्या सततच्या रेट्या मुळेच मी हा निधी देऊ शकलो येथुन पुढे मंदिर सुशोभीकरणासाठी आवश्यक असणारे सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ते मुरगुड ता. कागल येथील अंबाबाई मंदिराच्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार मुश्रीफ यांनी अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. अध्यक्षस्थानी मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.

स्वागत राजु आमते यांनी तर प्रास्ताविक दिग्विजयसिंह पाटील यांनी केले. यावेळी प्रवीणसिंह पाटील यांनी अंबाबाई मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले प्रसंगी रणजित सुर्यवंशी, सुधीर सावर्डेकर, शामराव घाटगे यांची भाषणे झाली.

प्रसंगी नगरसेवक राहुल वंडकर, मनाजी सासने, संदिप भारमल, दादासो चौगुले,काका दबडे,शंकर गुरव.संजय मोरबाळे, विजय मेंडके आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks