नागरदळेत दुर्गामातेची प्रतिष्टापणा

नागरदळे (ता.चंदगड) येथे जय दुर्गामाता युवक मंडळ, आयोजित नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. जय हनुमान लेझीम पथक, घुल्लेवाडी यांच्या ढोल – ताशा व लेझीमच्या गजरात देवीच्या भव्य मिरवणुकीने उत्सवाला सुरवात झाली. यावेळी सर्व भाविक भक्तांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले.
श्री. पुन्नापा सुतार रा. माणगाव ता. चंदगड यांनी मूर्ती बनवली असून गावचे श्री मनोहर राणबा पाटील (एक्स आर्मीमॅन) यांनी यावर्षी मूर्ती दिली आहे. दुर्गामातेची मूर्ति ढोलगरवाडी मार्गे नागरदळे येथे आणण्यात आली. त्यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष, गावचे विद्यमान सरपंच श्री. दिलीप मारुती पाटिल यांच्या हस्ते पूजा करुन भव्य मिरवणूकीला सुरुवात झाली. नागरदळे बस स्टैंड पासून, मठ्ठ गल्ली, मारुती गल्ली ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर पर्यंत मिरवणुक काढण्यात आली.
तसेच नवरात्र मधे नऊ दिवस मंडळाकडून समाज प्रभोधनपर व्याख्यान, हळदी- कुंकू कार्यक्रम, सेवानिवृत्त सत्कार समारंभ, होम मिनिस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. सुबराव पाटिल यांनी केले आहे.