Maharashtra Monsoon : 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार ; हवामान विभागाची माहिती

टीम ऑनलाईन :
मान्सूनच्या बाबतीत हवामान विभागानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून (सोमवार) महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.
राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे