ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निपाणी : गांजा विक्री प्रकरणी एका युवकास अटक ; निपाणी पोलिसांची कारवाई

निपाणी प्रतिनिधी :
गायकवाडी (ता निपाणी) येथे गांजा बाळगल्या प्रकरणी निपाणी ग्रामीण पोलिसांनी आज शुक्रवारी छापा टाकून एकाला अटक केली. केदार प्रल्हाद सुतार (वय 25, रा. कोडणी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
संशयिताला अटक करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केदार गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सकाळी पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून केदारला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. गांजाची किंमत अंदाजे बाजारभावाने 7 हजार रुपये असल्याचे समजते.