स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पश्चातही सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच शाहूच्या यशाचा चढता आलेख : श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पश्चातही शाहूच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे. हे अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले . श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेस सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरांशी मंजुरी दिली.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्यामार्फत स्पेंट वॉश ड्रायर प्रकल्प उभारून त्यापासूनच्या पावडर पासून पोटॅश गोळी तयार करण्याचा मानस आहे.सद्या सुरू असलेल्या बायोगॅस निर्मितीपासून बायो सीएनजी निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे. कारखाना वैद्यकीय,शैक्षणिक क्षेत्रात उतरणार आहे.60 हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेचा इथेनाॕल प्रकल्प आणखी 90 हजार लिटर वाढवून एकूण 150 हजार लिटर प्रति दिन क्षमतेचा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यात दीड वर्षाचा कालावधी लागेल.
कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल,कारखान्यास सन २०२१-२२ करीता नॕशनल फेडरेशन आॕफ को आॕप शुगर फॕक्टरीज,नवी दिल्ली यांचेकडून देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार,वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग काँग्रेस मुंबई यांच्याकडून अन्न व शेती विभागात सर्वोत्कृष्ट उत्पादकता पुरस्कार, को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार तसेच डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन पुणे यांच्याकडून राजे समरजितसिंह घाटगे यांना वैयक्तिक “साखर उद्योग गौरव पुरस्कार”मिळाल्याबद्दल त्यांच्यासह कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे तथा आईसाहेब यांचा सत्कार सभासद व शेतकरी यांचे वतीने ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते केला.
सभेच्या सुरूवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पुजन श्री.घाटगे यांनी केले.स्वागत व श्रध्दांजली वाचन व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले.
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.सभासदांकडून आलेले अभिनंदन ठराव वाचन असि.सेक्रेटरी व्ही.एल.जत्राटे यांनी केले.
या सभेस जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक,राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे वीरेंद्रसिंहराजे घाटगे आधी उपस्थित होते,आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले. वंदे मातरम् होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली.