दूध उत्पादकांनी घाबरून जाऊ नये : नविद मुश्रीफ ; बानगे येथे मोफत लम्पी लसीकरण मोहीम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बानगे (ता. कागल) गावात लम्पी बाधित जनावरे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा. गोकुळ दूध संघामार्फत संबंधित जनावरांवर आवश्यक उपचार केले जात आहेत. दूध उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ यांनी केले.
यावेळी नविद मुश्रीफ यांनी जनावरांवर योग्य ते उपचार करण्याच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या.
यावेळी अमर पाटील , निवास पाटील, प्रकाश कदम, धनाजी पाटील, संतराम पाटील, विलास पाटील, शेखर सावंत, मोहन पाटील, रघुनाथ बोंगार्डे, संजय कदम, महेबूब मुजावर, रामदास पाटील, राहुल पाटील, प्रफुल परीट, मारुती पाटील, कृष्णात डावरे, गजानन नाटकुळे, दिगंबर पाटील, आनंदा चौगले, प्रकाश तेली, आप्पासो कवडे, बाळासो बोंगार्डे, कचरुद्दीन पटेल, बाळासो पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.