सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व शासन निर्णय अन्वये कै.अनिरुद्ध संजय लाड यांचे कुटुंबांला न्याय मिळालाच पाहिजे.- सुरेश तामोत

कराड नगरपरिषद कराड
जिल्हा सातारा यांचेकडील सफाई कर्मचारी
कै.अनिरुद्ध संजय लाड
वय वर्षे २२ याचे दि.१४/०९/२०२२ रोजी शहरातील मेन ड्रेनेज साफ करताना ३० फूट खोल ड्रेनेज चेंबर मध्ये गुदमरून मृत्यू झाला होता.
कै.अनिरुद्ध संजय लाड यांचे कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता
शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे
राज्य मुख्य सचिव,
श्री.सुरेश तामोत
आणि
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
श्री.प्रभाकर लाड
यांनी कराड नगरपरिषदचे मुख्याधिकारी
श्री.रमाकांत डाके
यांची भेट घेऊन कै.अनिरुद्ध संजय लाड यांचे कुटुंबाला न्याय मिळावा याकरिता–
१)कुटुंबातील एकास कायोॆत्तर मंजुरीने ३० दिवसात नियुक्ती द्यावी.
२) डीसीपीएस / एनपीएस राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत रु.१० लाख अनुदान मिळावे.
३) मा.सर्वोच्च न्यायालय रिट याचिका क्र. ५८३/२००३ मध्ये दिनांक २७/०३/२०१४ रोजी पारित केले आदेश अन्वये रु.१० लाख मिळावे.
अशी मागणी प्रभावीपणे केली व निवेदन दिले.
यावेळी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात याकरिता आग्रही भूमिका घेण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे शहर अध्यक्ष श्री.राजेश चव्हाण, विशाल बनसोडे हे उपस्थित होते. अशी माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.अनिल लाड यांनी दिली आहे