बोरवडेतील संत गोरा कुंभार मंडळाच्यावतीने सत्कार समारंभ संपन्न

बिद्री ता. १० ( प्रतिनिधी अक्षय घोडके) :
बोरवडे ( ता. कागल ) येथील श्री संत गोरा कुंभार तरुण मंडळाच्यावतीने गणपती उत्सवानिमित्त दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, यशस्वी खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन परीट होते.
यावेळी सेवानिवृत्त जवान संदीप कुंभार, युवराज मगदूम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तर विद्यामंदिर कुंभारवाडा शाळेचे शिक्षक विक्रम कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्कार कुंभार या खेळाडूची मुंबई येथील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी नारायण कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अक्षय कुंभार, दिगंबर कुंभार, संतोष कुंभार, अजिंक्य जमणिक, उत्तम कुंभार, विष्णू कुंभार, आनंदा जमणिक, शिवाजी कुंभार, विनायक कुंभार, आकाश कुंभार, सुनील कुंभार, राहुल कुंभार, संदीप कुंभार, सुरेश कुंभार, गणेश कुंभार, किरण कुंभार , सचिन कुंभार, धनाजी कुंभार, विलास कुंभार, निवृत्ती कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत डी. एम. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सी. डी. कुंभार यांनी केले तर आभार बंडोपंत कुंभार यांनी मानले.