इंदिरा गांधी,संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्रांचे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथे इंदिरा गांधी,संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या प्रलंबित असलेल्या १४८ लाभार्थ्यांना पेन्शनच्या मंजुरी पत्राचे वाटप शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, सरकार बदलल्यामुळे इंदिरा गांधी ,संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. मा.तहसीलदार यांचेकडे त्याबाबत पाठपुरावा केला त्यापैकी 148 प्रस्ताव मंजूर झाले,अजूनही अंदाजे एक हजार प्रस्ताव प्रलंबीत आहेत. लवकरच ते ही मार्गी लावू.या लाभार्थ्यांनी कुणाचेही दबावाखाली येऊ नये.
यापुढे राजे बँकेच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन वाटप करू. कार्यकर्त्यांनी पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही. यादृष्टीने काम करावे.
श्री घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित असलेली मंजुरी पत्रे मिळाल्यामुळे या लाभार्थ्यांच्या वतीने श्री घाटगे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी अरुण गुरव,गंगाराम कुंभार,हिदायत नायकवडी,महेश माने,हनुमंत वड्ड आदी उपस्थित होते