सदाशिवराव मंडलिक महाविद्यायातर्फे ‘हर घर तिरंगा रॅली’ यशस्वी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारतर्फे संपूर्ण देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सदाशिवराव मंडलिक महाविद्यायातर्फे शिंदेवाडी या गावामध्ये एन सी सी व एन एस एस च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ व ‘सबका यही नारा हो, हर घर तिरंगा हो’ अशा घोषणा देत सर्व शिंदेवाडी गावातून प्रत्येक गल्लिमधून एन. सी. सी. कैडेट्स नी रॅली काढली. तसेच ग्रामपंचयतीतर्फे तिरंगा वाटप उपक्रमातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान, एन एस एस प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. ए. डी. जोशी, पर्यावरण संसाधन विभाग प्रमुख प्रा. डी. ए. सरदेसाई यांच्यासह इतर प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ग्रामस्थ व बाल चमू ही उत्साहाने या रॅली मध्ये सामील झाले. गावाच्या मध्यभागी महाविद्यालातर्फे ग्रामस्थांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा घोषणा देऊन सांगता करण्यात आली.