ताज्या बातम्यामहाराष्ट्र
स्वराज्य निर्माण संस्थेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान रॅली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुसळधार पाऊस असतानाही अवचितवाडी येथील स्वराज्य निर्माण संस्थेच्या माध्यमातून अवचितवाडी, चिमगाव, शिंदेवाडी, यमगे, सुरुपली, कुरुकली या गावांमध्ये जाऊन घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली.
रॅलीच्या सुरुवातीला स्वराज्य निर्माण संस्थापक संदीप बोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विठ्ठल शिंत्रे, भिवाजी गायकवाड, परशुराम मोरबाळे, निवृत्ती गायकवाड, सचिन भारमल, रामचंद्र वास्कर, आनंद भारमल, स्वप्नील मोरबाळे आदी उपस्थित होते.