‘आमचा गाव ,आमचा विकास’ यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सुरुते सरपंच मारुती पाटील यांना जाहीर.

नेसरी प्रतिनिधी :
“आमचा गाव आमचा विकास “,यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श नायक तथा आदर्श सरपंच पुरस्कार सुरुते,ता.चंदगड, जि. कोल्हापूर चे सरपंच मारुती गंगाराम पाटील यांना देण्यात आला.
आमचा गाव आमचा विकास यांच्यावतीने आयोजित सरपंच संवाद कार्यशाळा 2022 चे औचित्य साधून मा.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी ,संजयसिंह चव्हाण ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, राणी पाटील , अध्यक्ष महिला सरपंच संघटना, प्रभाकर पाटील , संस्थापक आमचा गाव ,आमचा विकास,व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी “स्वयंपूर्ण खेडी स्वयंपूर्ण भारत उभा करतील”. हे महात्मा गांधीजींचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून सुरुते गावचे सरपंच मारुती गंगाराम पाटील यांनी सहकारी ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक व गावकऱ्यांच्या सहकार्याने साधलेला विकास तसेच गावाच्या विकासप्रती असणारी बांधिलकी लक्षात ठेऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला. व यापुढेही अशाच प्रकारे गावाचा विकास व्हावा यासाठी आपल्या हातून उत्तमोत्तम कार्य व्हावे यासाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.
सुरुते गावाचा सर्वांगीण विकास होणेकामी सरपंच व ग्रामपंचयात सदस्य चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत त्यांना हा मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे असे मत गावकरी व्यक्त करत आहेत, या मिळालेल्या पुरस्काराबद्दल गावकऱ्यामधून समाधान व्यक्त होत आहे.