नवोदिता घाटगे यांचेविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मुरगुडमध्ये गाडेकरांचा निषेध

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जिजाऊ महिला संघटनेच्या संस्थापिका नवोदिता घाटगे यांच्याविषयी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी बेतालपणे अवमानकारक वक्तव्य केले. याचा मुरगूडमध्ये भाजप व शाहू ग्रुपच्या वतीने निषेध करण्यात आला. महिलांच्याविषयी अपशब्द वापरून अवमान करणार्यांना धडा शिकविला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. असे मत निषेध व्यक्त करणार्यांनी व्यक्त केले
सौ नवोदिता घाटगे यांचेविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मुरगूडमधील बसस्थानक चौकात भाजपच्या व शाहू ग्रुपच्या कार्यकत्यांनी निषेध केला. यामध्ये माहिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अश्विनी गुरव, अमृता सुतार, अश्विनी मांगोरे, वैष्णवी राजिगरे, विजया चौगले, आशा एकल, सुजाता चौगले, करुणा कांबळे, ज्योती डवरी, शिवानी साळोखे या महिला कार्यकर्त्यांबरोबर माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडीस, माजी नगरसेवक विलास गुरव, ‘बिद्री’चे माजी संचालक दत्तामामा खराडे , अमर चौगले (छोटू), सुशांत मांगोरे, विजय राजगिरे, अमर चौगले, युवराज कांबळे, जयवंत पाटील, सुरज एकल, सचिन गुरव, नाना डवरी, संग्राम साळोखे, सुनील कांबळे, तानाजी साळोखे, रोहन रणवरे, मारुती पोवार, प्रवीण मांगोरे, विनोद निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यास उपस्थित होते.