ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दादासाहेब लाड यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय तर विरोधकांचा उडाला धुव्वा

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकारी सत्ताधारी आघाडीने 21 पैकी 21 जागा जिंकून सलग चौथ्यांदा सत्ता स्थापित केली. आमदार जयंत तासगावकर यांच्या राजश्री शाहू लोकशाही विकास पॅनेलचा धुवा उडाला.

शिक्षक आमदार जयंत तासगावकर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीत दादासाहेब लाड किंगमेकर ठरले. संपूर्ण निकाल जाहीर होता सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. कोजिमाशीचे विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर व संचालक राजेंद्र रानमाळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक केली. तर संचालक अनिल चव्हाण हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

कोजिमाशिच्या 21 जागेसाठी 47 उमेदवार रिंगणात होते. कोजिमाशिची सभासद संख्या 8526 इतकी आहे. त्यापैकी 8106 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी 95.7% इतकी आहे. कोजिमाशिच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर माध्यमिक शिक्षण जगत ढवळले होते. आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली होती. आमदार आसगावकर व दादा लाड यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. कोजिमाशीमध्ये गेली 18 वर्षे दादा लाड यांची सत्ता आहे. यंदा सत्ताधारी आघाडी निवडणूक जिंकून विजय चौकार मारणार असा ठाम निर्धार दादा लाड यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता.

दुसरीकडे आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीने कोजिमाशीमध्ये परिवर्तन घडवायचे ‌ या इराद्याने प्रचार यंत्रणा राबवली होती. शनिवारी झालेल्या मतदानात 97.7%इतके मतदान झाल्याने सभासद कोणाला कौल देणार याविषयी उत्कंठा वाढली होती.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दादा लाड यांच्या सत्ताधारी गटाने आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनुसार ही आघाडी वाढत गेली आणि दादा लाड यांनी कोजिमाशिवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks